Narendra Modi : तुमचा बूथ जिंकलात, ह्रदये जिंकली तर आपला विजय निश्चित : नरेंद्र मोदी

Advertisements
Advertisements
Spread the love

कार्यकर्त्यांना आपली परिक्षेची वेळ आली आहे असं सांगताना विद्यार्थी कितीही हुशार असला तरी परिक्षेच्या शेवटी संपूर्ण ताकद लावावी लागते असं ते म्हणाले. तुमचा बूथ जिंकलात, त्यांची ह्रदये जिंकली तर आपला विजय निश्चित आहे असं नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. भाजपाने ‘मेरा बूथ सबसे मजबूत’ कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. यानिमित्त कार्यकर्त्यांशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणाव स्थितीवरही  भाष्य केलं.

Advertisements

भारताची प्रगती रोखणं दहशतवाद्याचं लक्ष असून भारताला अस्थिर कऱण्यासाठी शत्रू देश प्रयत्न करत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. देशात शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं.

Advertisements
Advertisements

‘देशाची सुरक्षा आणि सामर्थ्याचा संकल्प करुन आपला जवान सीमेवर उभा आहे. आपण सगळे पराक्रमी भारताचे नागरिक आहोत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना देशाची समृद्धी आणि सन्मानासाठी दिवस-रात्र एक करावा लागेल. आमचा सैन्याच्या सामर्थ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे असं काहीही होऊ नये, ज्यामुळे त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम होईल किंवा शत्रूंना आपल्याकडे बोट दाखवण्याची संधी मिळेल’, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

आपलं सरकार