मोदी, शहा गुंडच !! हे देशाला बरबाद करतील : न्या. कोळसे पाटील

Advertisements
Advertisements
Spread the love

आज देश संकटात असताना मोदी आणि शहा नावाचे गुंड देशाला बरबाद करणार, अशी टीका माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी केली. शिवगौरव शिवसन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, लेखक प्रताप गंगावणे, अभिनेते शंतनू मोघे, शाहीर दादा पासलकर, विकास पासलकर आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष शहा यांना उद्देशून ते म्हणाले की, गोध्रा,अहमदाबाद आणि आता पुलावामाही त्यांनीच घडवून आणलं आहे. मिलिंद एकबोटे, संभाजी भिडे यांनी दंगल घडवली, त्याचे पुरावे आहेत.मात्र काहीही कारवाई झाली नाही. मोदी यांनी केलेल्या केलेल्या खुनाची यादी ऐकली तर तुम्हाला रात्रभर झोप येणार नाही असेही ते म्हणाले.
शरद पवार यांच्या विषयीचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. माझे आणि शरद पवार यांचे संबंध फारसे चांगले नाहीत,आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत हा प्रचार खोटा असून मी आणि ते मागील 30 वर्ष सोबत आहोत असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
पुढे ते म्हणाले की, पवार आणि मी कायम समांतर चालत होतो. नरेंद्र मोदी नावाचा खूनी गुंड पंतप्रधान होतो त्यापेक्षा पवार तुम्ही हजारपट चांगले आहात असेही सांगायला ते विसरले नाहीत. मी कायमच तुमचा हितचिंतक आहे असे सांगायलाही ते विसरले नाहीत.
मराठा आरक्षणावरही त्यांनी आपले मत मांडले. आम्ही खरं सांगत होतो की आरक्षण मिळणार नाही. मुख्यमंत्री मराठा समाजसोबत साप मुंगसाप्रमाणे खेळत होते. त्यामुळे मराठा बांधवांनी आपला शत्रू ओळखावा असे आवाहन त्यांनी केले.

Advertisements

आपलं सरकार