लोकसभा निवडणुकीत हवाई हल्ल्याचा भाजपला फायदा होईल असे बोलणाऱ्या येडियुरप्पाची अभिनेत्रींनीं काढली लाज

Advertisements
Spread the love

सर्वत्र येडियुरप्पावर संतप्त शब्दात टीका…

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेल्या हवाई हल्ल्याचा लोकसभा निवडणुकीत फायदा होईल असे वक्तव्य करणारे भाजपा नेते आणि कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी  केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर सर्वच स्तरातून टीका होत होत असताना  सिनेअभिनेत्रींनीही चांगलेच सुनावले आहे. जरा तरी लाज बाळगा, हा काही व्हिडिओ गेम नाही, अशा शब्दांत अभिनेत्री रिचा चड्ढाने तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त करीत अक्षरशःलाज काढलीआहे.

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याचा भाजपाला लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यात २२ हून अधिक जागा जिंकण्यासाठी फायदा होईल असे वक्तव्य येडियुरप्पा यांनी केले होते.  या हवाई हल्ल्यांचा भाजपाला फायदा होईल  असे मत व्यक्त करताना  होते कि , देशामध्ये मोदी समर्थनाची लाट असून देशातील राजकीय हवा भाजपाच्या बाजूनेच वाहत आहे त्यावर रिचाने संताप व्यक्त करत ट्विट केले, ‘जरा तरी लाज बाळगा. हा काही व्हिडिओ गेम नाही. लोकांचे प्राण गेले आहेत.’ दरम्यान अभिनेत्री रेणुका शहाणेंनीही ट्विटरच्या माध्यमातून येडियुरप्पांवर टीका केली. ‘सीमेवर जवान शत्रूंशी लढा देत असताना, विंग कमांडर अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात असताना काही लोकांना फक्त मतांमध्येच रस आहे. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. “तख्त पे चाहे जो भी बैठे वे सुरक्षित है इस बात से की शहीद तो अपने जवान ही होंगे,’ असं ट्विट रेणुका शहाणेंनी केलं आहे. दरम्यान याचा खुलासा करताना ते म्हणजे कि,मी हे आज म्हणतो असे नाही तर नेहमीच म्हणतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला जातोय.

Air strikes will help us win more than 22 Lok Sabha seats: BJP leader BS Yeddyurappa