बडगाम हेलिकॉप्टर दुर्घटना : नाशिकचे वीर जवान निनाद यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Advertisements
Spread the love

जम्मु-काश्मिरच्या भारत-पाक सीमेवर मागील चार दिवसांपासून निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थीतीत लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे सीमेवर टेहळणी करत असताना हेलिकॉप्टर कोसळून वैमानिक निनाद अनिल मांडवगणे (वय ३३) यांना वीरमरण आले. निनाद हे मुळ नाशिकचे. त्यांचे माता-पिता बॅँकेतून सेवानिवृत्त असून ते पुणे महामार्गावरील रवीशंकर मार्गालगत बॅँक आॅफ इंडिया कॉलनीत वास्तव्यास आहे. निनाद यांचे पार्थीव वायुसेनेच्या विमानातून रात्री दहा वाजेच्या सुमारास ओझर विमानतळावर आणण्यात आले. यावेळी भारतीय सैन्याकडून त्यांना मानवंदना देण्यात आली.  शुक्रवारी सकाळी दहा वाजता नाशिक अमरधामजवळील गोदावरीच्या काठावर सिंहस्थ कुंभमेळ्यात बांधण्यात आलेल्या नव्या घाटाजवळ मैदानात त्यांच्या पार्थिवावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. निनाद यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. निनाद यांचे सैनिकी शिक्षण औरंगाबादेत झालेहोते.

शहीद निनाद यांच्यावर नाशिक येथेच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतल्यामुळे बुधवारी रात्री हवाई दलाने शहीद निनाद यांच्या लखनऊ येथील घरी चार दिवसांपुर्वीच नातीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पोहचलेल्या आजी, आजोबा व निनाद यांच्या पत्नीला आई, वडील, पत्नी व मुलगी अशा चौघांची नाशिक येथे पाठविण्यासाठी विमानाने सोय केली. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेसात वाजता मांडवगणे कुटुंबीयांनी लखनऊ येथून इंडिगो विमानाने मुंबईत दाखल झाले. दुपारी खासगी वाहनाने तीन वाजेच्या सुमारास ते निवासस्थानी पोहोचले. दरम्यान, शहीद निनाद यांचा लहान भाऊ निरव हा जर्मनीत एमबीएच्या प्रशिक्षणासाठी गेला असून, त्यालाही घटनेची माहिती देण्यात आल्याने तो नाशिककडे येण्यास निघाला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत तो नाशकात पोहोचेल असे, त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.