Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MahaBudget2019 : इंदू मिलच्या डॉ. आंबेडकर स्मारकासाठी १६० कोटींची तरतूद

Spread the love

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणाची (एमएमआरडीए) 147वी बैठक काल, विधानभवन येथे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली. मंत्री श्री प्रकाश मेहता आणि विविध महापालिकांचे महापौर यावेळी उपस्थित होते. या बैठकीत एमएमआरडीएच्या 16,909 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आली. यात मेट्रो 1 साठी 98 कोटी, मेट्रो 2 ‘अ’साठी 1895 कोटी रूपये, मेट्रो 2 ‘ब’ साठी 519 कोटी रूपये, मेट्रो 3साठी 650 कोटी, मेट्रो 4 साठी 1337 कोटी रूपये, मेट्रो 5 साठी 150 कोटी रूपये, मेट्रो 6 साठी 800 कोटी रूपये, मेट्रो 7 साठी 1921 कोटी, तसेच मेट्रो 8, 9 आणि 10 साठी 15 कोटी रूपये तरतूद करण्यात आली आहे. 100 कोटी रूपये तरतूद मेट्रो भवनसाठी करण्यात आली असून, इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी 160 कोटी रूपये तरतूद करण्यात आली आहे. 700 कोटी रूपये तरतूद सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी करण्यात आली असून, 2250 कोटी रूपये तरतूद विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉरसाठी करण्यात आली आहे. याशिवाय इतरही पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तरतुदी करण्यात आल्या आहेत. विविध प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिल्या आणि त्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांपुढे करण्यात आले. एमटीएचएलसाठी 3000 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. कांजूरमार्ग ते बदलापूर आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मार्गांसाठी मेट्रोच्या दृष्टीने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे निर्देश सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!