Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

जाता जाता : राज्य शासनाचा मोठ्या शिक्षक भरतीचा निर्णय

Spread the love

प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक भरतीसाठी तयार करण्यात आलेल्या पवित्र पोर्टलवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून २ मार्च रोजी ही जाहिरात उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी खुली होणार आहे.

????१०,००१ शिक्षकांची होणार भरती

☑️ अनुसूचित जाती- १७०४
☑️ अनुसूचित जमाती- २१४७
☑️ अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५
☑️ व्हिजेए- ४०७
☑️ एनटी-बी- २४०
☑️ एनटी-सी- २४०
☑️ एनटी-डी- १९९
☑️ इमाव- १७१२
☑️ इडब्ल्यूएस- ५४०
☑️ एसबीसी- २०९
☑️ एसईबीसी- ११५४
☑️ सर्वसाधारण- ९२४

???? सुमारे ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी. सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरीत भरल्या जातील, तोपर्यंत ५० टक्के तिथल्या जागा भरल्या जातील.

???? पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भ्रष्टाचारविरहीत ही पहिलीच शिक्षक भरती होणार. यातून भरतीच्या वेळी होणारे शिक्षकांचे शोषण थांबविण्यात शासनाला यश आले आहे. विद्यार्थ्यांनी पवित्र पोर्टलमध्ये अर्ज करताना पोर्टलवरील माहिती शांतपणे वाचावी, कोणीही गोंधळून जाऊ नये, त्यामुळे त्यात कमीत कमी त्रुटी राहतील. अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरती आता सुरु होत असल्याचे शिक्षणमंत्री श्री. विनोद तावडे यांनी सांगितले.

????शिक्षक भरतीची जाहिरात पवित्र पोर्टलवर सध्या संस्थाचालक आणि शिक्षणाधिकारी यांना उपलब्ध होईल.

????२ मार्च रोजी शिक्षकभरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार, त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!