Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्रातील २० आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Spread the love

राज्य सरकारने सोमवारी वीस आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. तसेच महाराष्ट्र पोलिस सेवेतील सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गृह विभागाचे उप सचिव कैलास गायकवाड यांच्या स्वाक्षरीने हे आदेश पारित करण्यात आले.
कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून विद्यमान आयुक्त रवींद्र सिंगल यांच्याकडे औरंगाबाद परिक्षेत्रची जबाबदारी देण्यात आली आहे. सुहास वारके- विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र, पी.पी.मुत्याल- विशेष पोलिस महानिरीक्षक नांदेड परिक्षेत्र, फत्तेसिंह पाटील – गुन्हे अन्वेषण विभाग पुणे, सुनील रामानंद -पोलिस महानिरीक्षक राज्य सुरक्षा महामंडळ अशी बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. बदली करण्यात आलेल्या अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये दत्ता कराळे – अपर पोलिस आयुक्त पूर्व विभाग ठाणे, प्रताप दिघावकर – उप महानिरीक्षक महिला अत्याचार प्रतिबंधक मुंबई, जयंत नाईकनवरे – उप महानिरीक्षक दहशतवाद विरोधी पथक, संजय दराडे – उप महानिरीक्षक विक्रीकर, सेवाकर, पी.व्ही.उगले – अधीक्षक जळगाव, विनिता साहू – अधीक्षक गोंदिया, हरीश बैजल – समादेशक राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक ६ धुळे, अरविंद साळवे – अधीक्षक भंडारा, जयंत मीणा – अपर पोलिस बारामती,पुणे ग्रामीण, पंकज देशमुख – उपायुक्त पुणे शहर, तेजस्वी सातपुते – अधीक्षक सातारा, दत्ता शिंदे – अधीक्षक जळगाव, ईशू सिंधू – अधीक्षक अहमदनगर, रंजनकुमार शर्मा – अधीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग नागपूर यांचा समावेश आहे.
अपर पोलिस अधीक्षक दर्जाच्या सात अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुनील कडासने- अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक, संदीप पखाले – अपर पोलिस अधीक्षक बीड, वैभव कलबुर्गे- अपर पोलिस अधीक्षक चंद्रपूर, हेमराज राजपूत – अपर पोलिस अधीक्षक खामगाव बुलढाणा, श्याम घुगे – अपर पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण, सचिन पी.गोरे – अपर पोलिस अधीक्षक चाळीसगांव जळगांव, प्रशांत बच्छाव – प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे यांचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!