Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Nokia 9 PureView : 5 रिअर कॅमेरे असणारा जगातला पहिला स्मार्टफोन

Spread the love

नोकिया फोनची निर्मीती करणाऱ्या HMD Global कंपनीने Nokia 9 PureView हा नवा स्मार्टफोन लाँच केला आहे. बार्सिलोनामध्ये आयोजित मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये कंपनीने हा स्मार्टफोन लाँच केला. रिअर अर्थात मागील बाजूला 5 कॅमेऱ्यांचा सेटअप असलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन असल्याचा दावा कंपनीने केला आहे. ‘नोकिया 9 प्युअर व्ह्यू’ या स्मार्टफोनची विक्री मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. सध्या काही मोजक्या ठिकाणी नोकियाने प्री-ऑर्डर घेणे सुरू केले आहे.
नोकिया 9 प्युअर व्ह्यू या स्मार्टफोनच्या मागे 12 मेगापिक्सलचे 5 कॅमेरे आहेत. या पाचपैकी दोन कॅमेरे कलर आहेत. तर, तीन कॅमेरे मोनोक्रोम आहे. त्यामुळे ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो अधिक चांगल्या प्रकारे काढता येणार आहेत. 699 डॉलर म्हणजे जवळपास 50 हजार रुपये इतकी या स्मार्टफोनची किंमत आहे. मागील बाजूच्या पाच कॅमेऱ्यांव्यतिरिक्त या स्मार्टफोनमध्ये सेल्फीसाठी 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन मिडनाइट ब्लू रंगात उपलब्ध असणार आहे. ‘अॅण्ड्रॉइड 9.0 पाय आउट ऑफ द बॉक्स’ ओएस असलेल्या या स्मार्टफोनची स्क्रीन 5.99 इंच इतकी असून कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 आहे. यामध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅम असून 128 जीबी स्टोरेज आहे. बॅटरी क्षमता 3320 एमएएच इतकी असून क्यूआय वायरलेस चार्जिंग आहे. तसंच फोनमध्ये फेशियल अनलॉक आणि फिंगरप्रिंट सेंसरदेखील आहे. या फोनची किंमत 699 डॉलर म्हणजे जवळपास 50 हजार रुपये आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!