Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मोदींच्या “पायधुणे ” प्रकरणावरून सोशल मीडियात रंगली चर्चा …

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून या विषयावरून मोठी चर्चा सुरु आहे .मोदींच्या या कृत्याचे त्यांच्या भक्तगणांकडून समर्थन आणि कौतुक केले जात आहे तर त्यांच्या विरोधी असणाऱ्यांकडून त्यांचा हा निवडणुकीचा स्टंट असल्याची टीका केली जात आहे. विरोधी पक्षातील काही नेत्यांनी मोदींनी अशी कामं करण्यापेक्षा चांगली नोकरी आणि वेतन कसे उपलब्ध करुन देता येईल याकडे लक्ष द्यावं असा टोमणा मारला आहे.
सफाई कर्मचारी काय म्हणतात ?
दरम्यान याप्रकरणी मोदींनी ज्या सफाई कर्मचाऱ्याचे पाय धुतले त्यांचीही प्रतिक्रिया आली आहे. यामधील एक असणाऱ्या नरेश कुमार यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, ‘पंतप्रधान आपले पाय धुतील असा विचारही कधी केला नव्हता’. तर ज्योती यांचं म्हणणं आहे की, ‘असा मान सन्मान आजपर्यंत आपल्याला कधीच मिळाला नव्हता’. अन्य एकाने आपण जणू काही स्वप्नच पाहत आहोत असा भास होत होता असं म्हटलं आहे. भविष्यात आपण नरेंद्र मोदींनाच मतदान करणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. अन्य एका सफाई कर्मचाऱ्यानेही मोदींना मतदान करणार असल्याचं सांगितलं आहे. मोदींनी फक्त आपले पाय धुतले नाहीत तर विचारपूसही केली असल्याचं त्याने सांगितलं. मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील असं त्याने पुढे म्हटलं.
छत्तीसगडमधील कोरबा येथील रहिवासी असणाऱ्या ज्योती यांनी सांगितलं की, ‘आमचा इतका सन्मान होईल, आम्हाला इतका अभिमान वाटेल असा कधी विचारच केला नव्हता. मी गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कुंभ मेळ्यात काम करत आहे’. होरीलाल यांनी सांगितलं की, ‘पंतप्रधान आमचे पाय धुतील असा कधी विचारच केला नव्हता. त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलं आणि म्हणाले की तुम्ही चांगलं काम केलं आहे, कुठेही कचरा दिसला नाही’.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!