Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाचवीतला विद्यार्थी परीक्षेच्या भीतीने पळाला खरा पण पोलिसांनी शोधला…

Royalty-free stock illustration of an African-American little boy with dark curly hair, holding his backpack with one hand and staring at his watch, sweating with anxiety as he is late for school.

Spread the love

परीक्षेला घाबरून ५ वी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने घर सोडले. जाताना या मुलाने कपडे आणि खर्चासाठी बाराशे रुपये बरोबर नेले होते. मुलगा घरात नसल्याचे समजल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी काहीवेळ त्याचा शोध घेतला. त्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी देखील गांभीर्य ओळखत शहरातील २५ हून अधिक चौकांमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे त्याला शोधून काढले. रविवारी (२४ फेब्रुवारी) रात्री कासारवाडी ते पिंपळेगुरव या परिसरात हा सर्व प्रकार घडला आहे.
शहरात काही महिन्यांमध्ये लहान मुलांच्या अपहरणाचे तीन प्रकार घडले आहेत. त्यामुळे भोसरी पोलिसांनी देखील तत्काळ त्याच्या शोधासाठी ८ ते १० टीम तयार केल्या. गुन्हे शाखेसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती कळविली. दरम्यान, भोसरी पोलिसांनी हा विद्यार्थी राहत असलेल्या घराजवळचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. तेव्हा तो एकटाच चालत जाताना दिसला. त्यामुळे एक-एक चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास पोलिसांनी सुरवात केली. तेव्हा तो ज्या-ज्या दिशेने जाताना दिसला त्या-त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास पोलिसांनी सुरवात केली. या विद्यार्थ्यांच्या घरापासून विविध दिशेला जाणाऱ्या २५ चौकातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांचा शोध सुरू होता. चार तास पोलिसांनी विविध तांत्रिक सहायकाच्या मदतीने तपास केल्यानंतर तो पिंपळेगुरव येथील डायनॉसर गार्डनकडे जाणाऱ्या रस्त्याने जाताना दिसला. त्यामुळे पोलिसांनी त्याचे घर ते पिंपळेगुरव या दरम्यानचा परिसर पिंजून काढण्यास सुरवात केली. तेव्हा तो डायनॉसर गार्डनजवळ एका ठिकाणी बसलेला पोलिसांना आढळून आला. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी त्याला शोधून काढण्यात यश मिळविले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर, सोमवारी परीक्षा असल्याने घरातून निघून गेल्याचे त्याने सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!