Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बांगला देशाच्या विमान अपहरणाचा प्रयत्न हणून पडला : सर्व प्रवासी सुखरूप

Spread the love

बांगलादेशमध्ये विमान अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे. ‘बिमान बांगलादेश’ एअरलाईन्सचे विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. ढाका-दुबई विमान क्र. ‘बीजी १४७’ या विमानाच्या अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर विमानचं इमर्जन्सी लँडिंग देखील करण्यात आलं आहे. दरम्यान, पोलीस व जलद कृती दलाचे सैनिक विमानतळावर पोहोचले असून विमानातील १४२ प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. तर अपहरणकर्त्या आरोपीलाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ‘बीजी १४७’ हे विमान दुबईहून चितगावमार्गे ढाका जात होतं. रविवारी संध्याकाळी ५ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास चितगाव विमानतळावर हे विमान उतरलं. विमानात १४२ प्रवासी होते. मात्र, त्याचवेळी एका बंदूकधारी व्यक्तीने विमानाच्या कॉकपीटमध्ये प्रवेश करुन विमानातील व्यवस्थेवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. विमान अपहरणाबाबत माहिती मिळताच तातडीने पोलीस व जलद कृती दलाच्या सैनिकांनी विमानाचा ताबा घेतला आणि अपहरणकर्त्याला अटक करुन सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका केली. अपहरणकर्त्यानं बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी बोलणी करून द्या अशी मागणीही केली होती अशीही माहिती आहे. दरम्यान विमान अपहरण करण्याचा हा प्रयत्न नेमका कशासाठी झाला होता याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. आरोपीकडे चौकशी केली जात आहे.
मुंबई विमानतळावर एअर इंडियाच्या ट्राफिक कंट्रोल रूमला एअर इंडियाचं विमान अपहरण करण्याची फोनवरून धमकी शनिवारी देण्यात आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. या फोन कॉलनंतर विमानतळांवरील सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. शिवाय, देशातील सर्व विमानतळांवर हाय अलर्ट देखील जारी करण्यात आला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!