Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Supriya Sule औरंगाबादच्या दौऱ्यात काय बोलल्या सुप्रिया सुळे ?

Spread the love

अलीकडच्या काळात खा . सुप्रिया सुळे यांचे औरंगाबाद दौरे वाढले आहेत . आज दिवसभर विविध कार्यक्रमात सुप्रियाताई डांग होत्या . एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी मन मोकळं करून सांगितलं कि , खासदारकी सोडून सरळ जम्मू-काश्मीरला सहा महिने जावसं वाटतय. कारण, तेथील समस्या जाणून घेऊन त्यावर सर्वांनी प्रेमाने काही मार्ग काढू, ‘मला दोन गोष्टी करायची इच्छा होतेय. सोडून द्यावी ही खासदारकी. कपडे बांधावेत, पॅक करावेत आणि जम्मू काश्‍मिरला सहा महिने जाऊन रहावे. तिथल्या समस्या जाणून घेऊन त्यावर सर्वांनी प्रेमाने काही मार्ग काढू.’ याचबरोबर, सत्ताधाऱ्यांवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘आमचे सत्तेतील लोक जम्मू-काश्मीरमधील आयांना सांगतात मुलांकडून बंदुक काढून घ्या. मला आश्‍चर्य वाटते या सत्तेतल्या लोकांचे. मला एक सांगा या देशातली नव्हे तर जगातली कुठली आई बंदुक घे म्हणून आपल्या मुलाला सांगते.’
जम्मू-काश्मीरबाबत बोलताना मेघालयचे गर्व्हनर म्हणाले, काश्‍मिरी वस्तु विकत घेऊ नका. असे केले तर तुम्हाला चालेल का? औरंगाबादला दंगल झाली. मी आले अन्‌ म्हटले अरे बाबा नको ते औरंगाबाद. त्यांच्या वस्तु नको आपल्याला. हे फक्‍त भांडणेच करतात. म्हणजे आणखी मी तेल ओतणार. तुम्हाला दुखवून जाणार. का करायचे असे, असेही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला. आम्ही वाट पाहत होतो पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात का? मात्र, या दहशतवादी हल्ल्यानंतर, दुसऱ्या दिवशी नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथील आयोजित सभेला हजेरी लावली होती, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!