Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

३५-ए रद्द केल्यास गंभीर परिणाम : महबुबा मुफ्ती यांची थेट धमकी

Spread the love

काश्मीरमधील नागरिकांना जमीन आणि स्थायी निवासासंदर्भातील विशेष हक्क प्रदान करणारे कलम ‘३५-अ’ रद्द केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा धमकीवजा इशारा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी केंद्रातील एनडीए सरकारला दिला आहे.

आगीशी खेळू नका, कलम ३५-ए शी छेडछाड करू नका नाहीतर १९४७ पासून आतापर्यंत जे तुम्ही पाहिलं नाही ते पहाल. जर असं झालं तर मला माहित नाही जम्मू-काश्मीरचे लोक तिरंग्याऐवजी कोणता झेंडा हाती घेतील,’ असं वक्तव्य मुफ्ती यांनी केलं आहे.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३५-ए च्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात या आठवड्यात २६ ते २८ फेब्रुवारीदरम्यान सुनावणी होणार आहे. कलम ३७० रद्द करणं ही नेहमी भाजपची राजकीय भूमिका राहिली आहे. त्यामुळे निवडणुकांआधी कलम ३५-अ वर मोदी सरकार कठोर भूमिका घेऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत असल्याने  काश्मिरच्या नेत्यांमध््ये अस्वस्थता आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!