Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आमचे मित्रपक्ष नाराज नाहीत चर्चा करूनच जागा वाटप : मुख्यमंत्री

Spread the love

शिवसेना नेहमीच आमच्या सोबत होती आहे आणि राहील . आमची ही शक्ती आता महाराष्ट्राच्या हितासाठी वापरू. आमचे मित्रपक्ष नाराज नाहीत. उद्या सर्व मित्रपक्ष चहापानाला भेटत आहेत. मित्रपक्षांची चर्चा करूनच जागा वाटप होईल. मित्रपक्षांची योग्य काळजी घेऊ.’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले . विरोधकांनी चहापानावर टाकलेल्या बहिष्काराबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले चहापान हे काही सेलिब्रेशन नाही तर सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन चर्चा करावी हा यामागचा उद्देश असतो. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील पाटील यांनी सांगितले होते. विरोधकांच्या या भूमिकेवरही मुख्यमंत्र्यांनी टीका केली. २७ तारखेला अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडणार आहेत. हे अर्थसंकल्पीय अधिवेशन असले तरी संपूर्ण अर्थसंकल्प अधिवेशनात मांडल जाणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आम्ही काय खेळ खळतो यापेक्षा विरोधकांचा काय खेळ होणार आहे याकडे त्यांनी बघावे अशी खरमरीत टीका मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केली. उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री बोलत होते. दरम्यान विरोधकांनी चहापाण्यावर बहिष्कार घातला आहे. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!