Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेससोबत आघाडी झाली तर ठिक अन्यथा दहा जागांवर लढू : अबू आझमी

Advertisements
Advertisements
Spread the love

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आघाडीत सहभागी होण्याबाबत अनुकुलता दर्शविली होती. मात्र, काँग्रेसकडून कोणतीही चर्चा केली जात नाही. यामुळे काँग्रेससोबत आघाडी झाली तर ठिक. नाही तर लोकसभा निवडणुकीत अन्य पक्षांसोबत आघाडी करून दहा जागांवर निवडणूक लढवू,’ असा निर्धार शनिवारी समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी व्यक्त केला.
आझमी किराडपुरा येथे आयोजित सभेसाठी आले असता पत्रकारांशी बोलत होते. आझमी म्हणाले, ‘सध्या कॉँग्रेसच्या महाआघाडीला विरोधी पक्षाकडून नाव ठेवली जात आहेत. वास्तवात मोदी यांनीच अनेक पक्षांशी आधीच आघाडी केली आहे. उत्तरप्रदेशात समाजवादी पक्ष हा मोठा आहे. त्या प्रमाणे काँग्रेसला जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात समाजवादी पक्षाची शक्ती कमी आहे. यामुळे राज्यात मतांचे विभाजन होऊ नये यासाठी आम्ही काँग्रेससमोर एक जागेचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडून कोणतीही चर्चा आमच्यासोबत झालेली नाही. काँग्रेसला मुस्लिम समाज आपल्या सोबत येणार असल्याची खात्री वाटत आहे. यामुळे काँग्रेसने आमच्यासोबत आघाडी केली नाही, तर आगामी लोकसभेत समाजवादी पक्ष राज्यातील अन्य पक्षांसोबत निवडणुकीच्या रंणागणात उतरेल. महाराष्ट्रात दहा जागांवर आम्ही उमेदवार उभे करणार आहोत,’ असेही आझमी म्हणाले.
‘एमएलए’ आणि समाजवादी पक्षाच्या वतीने किराडपुरा येथे सभा घेण्यात आली. या सभेत सध्याच्या परिस्थितीत जात, धर्म किंवा पंथाचा वाद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची गरज अबू आझमी यांनी व्यक्त केली. यावेळी समाजवादी पक्षाचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!