Maha Aghadi : धनंजय मुंडे यांनी गाजवली परळीची सभा !! चिक्की आणि धनंजय …

Advertisements
Advertisements
Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी अक्षरशः महाआघाडीच्या परळीची सभा गाजवली असेच म्हणावे लागेल. दस्तुरखुद्द शरद पवारांनी सुद्धा धनंजय मुंडे यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देऊन अभिनंदन केले . आपल्या धमाकेदार भाषणात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर शरसंधान करीत गर्जना केली कि , राष्ट्रवादीला संपवण्याची भाषा बीडमधले नेते करतात, मात्र लक्षात ठेवा राष्ट्रवादी काँग्रेस संपवणं हे चिक्की खाण्याएवढं सोपं नाही . परळीमध्ये सहा जिल्हापरिषद सदस्य , नगराध्यक्ष आणि २७ नगरसेवक आमचे आहेत. हिंमत असेल तर समोरासमोर या कोण संपतंय पाहू असं थेट आव्हानच पंकजा मुंडे यांना त्यांनी दिले. पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंचं डिपॉझिट जप्त करू असं वक्तव्य केलं होतं. या टीकेला उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर त्यांचा नामोल्लेख न करता निशाणा साधला.
परळीत झालेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या संयुक्त सभेत ते बोलत होते.या सभेत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली. मुख्यमंत्री परळीत आले होते, त्यांनी परळीवर टीका केली. मात्र मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा मस्तवाल सत्तेचा शेवट परळीत होतो. तुम्हाला परळीबद्दल इतकी अडचण आहे तर तुम्ही सुरुवात परळीपासून का केली? रायगडासारख्या पवित्र भूमितून का केली नाही? तुमच्या मनात काळं आहे हे यावरूनच स्पष्ट होतं असा टोला लगावत तुमच्या सोळा मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमत दाखवाल का? असाही प्रश्न धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला.
औरंगाबाद येथे गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक आणि महामंडळ झालंच नाही. विधानसभेत मी पराभूत झालो तरीही पवारसाहेबांनी मला विरोधी पक्ष नेतेपद दिलं, त्यामुळेच मी सर्वसामान्य माणसांचे प्रश्न मांडून त्यावर आवाज उठवू शकलो, परळीत आजवर मी एवढी मोठी सभा पाहिलेली नाही असंही धनंजय मुंडे त्यांच्या भाषणात म्हटले. याला स्वतः शरद पवार यांनीही दुजोरा देत . धनंजय मुंडे यांचे अभिनंदन करून आपल्या जीवनातील हि एक महत्वाची सभा आहे असे उदगार काढले .

Advertisements

आपलं सरकार