Sonakshi : ३७ लाख घेतले पण कार्यक्रमाला गेलीच नाही : सोनाक्षीवर गुन्हा

Spread the love

पैसे घेऊन ऐनवेळी कार्यक्रमास येण्यास नकार देणारी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा अडचणीत सापडली आहे. सोनाक्षीसह पाच जणांवर उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३७ लाखांची मोठी रक्कम घेऊन कार्यक्रमास अनुपस्थित राहिल्याचा आरोप तिच्यावर आहे. आयोजक प्रमोद शर्मा यांनी सोनाक्षीविरोधात तक्रार दाखल केली होती. पण याऊपरही आरोपींविरोधात कुठलीही कारवाई केली गेली नव्हती. यामुळे व्यथित होत प्रमोद शर्मा यांनी गत १३ फेबु्रवारीला विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. वेळीच उपचार मिळाल्याने ते बचावले होते.
प्राप्त माहितीनुसार, ३० सप्टेंबर २०१८ रोजी दिल्लीत इंडिया फॅशन अॅ्ण्ड ब्युटी अवार्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. या अवार्ड्स शोसाठी सोनाक्षीला बोलवण्यासाठी टॅलेंट फुलआॅन कंपनीचा संचालक अभिषेक सिन्हा आणि एक्सीड एंंटरटेनमेंटशी संपर्क साधण्यात आला होता. या कंपनीच्या माध्यमातून सोनाक्षीला एकूण २८ लाख १७ हजार रुपए देण्यात आले. संबंधित कंपनीला कमिशनपोटी पाच लाख देण्यात आले. यानंतर २१ जूनला अभिषेकच्या कंपनीने प्रमोद शमार्सोबत लेखी करारही केला. या करारापश्चात दिल्लीला होणा-या या इव्हेंटमध्ये सोनाक्षी येणार अशी होर्डिंगही लागलीत. मात्र ३० सप्टेंबरला ऐन कार्यक्रमाच्या दिवशी सोनाक्षीने आयोजकांना १० वाजताची फ्लाईट रद्द करून सव्वा तीनची फ्लाईट बुक करण्यास सांगितले. आयोजकांनी ६४ हजारांत दोन तिकिटे बुकही केलीत. पण याऊपरही सोनाक्षी या शोला आली नाही. सोनाक्षी न आल्याने गर्दीले कार्यक्रमात गोंधळ घातला. तोडफोड केली. आयोजकांना यामुळेही नुकसान सोसावे लागले. ३० सप्टेंबर २०१८ मध्ये हा कार्यक्रम पार पडणार होता. यासाठी सोनाक्षीला ३७ लाखांचे मानधन देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी सोनाक्षीने कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. त्यानंतर २४ नोव्हेंबरला तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद शर्मा यांनी ही तक्रार दाखल केली होती. सोनाक्षीसोबतच टॅलेंट फुल आॅफ कंपनीचे अभिषेक सिन्हा, मालविका पंजाबी, धूमिल ठक्कर, अॅटडगर सकारिया यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *