Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उद्यापासून महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन : विरोधकही सज्ज

Spread the love

महाराष्ट्र शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत असून हे अधिवेशन एक आठवडा चालणार आहे . २ मार्चला अधिवेशन हे अधिवेशन संपणार असून २७ फेब्रुवारीला राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत तर त्याच दिवशी विधान परिषदेत वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील. मात्र विरोधी पक्षाने अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यास विरोध केला असून लेखानुदानाच्या मागणीसाठी रणकंदन करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या अधिवेशनात १७ पेक्षा अधिक विधेयके व चार अध्यादेश सभागृहात सादर होतील.
या अधिवेशनाच्यापार्श्वभूमीवर आज विरोधकांनी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांकडून आलेल्या चहापानाच्या निमंत्रणावर बहिष्कार टाकला आणि भाजपा-शिवसेनेच्या नव्याने झालेल्या युतीवर जोरदार टीका केली.
‘पुलवामा हल्ल्यानंतर चहापान टाळता आले असते केवळ चर्चा केली असती’ असं विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले. तर, भाजपा शिवसेनेची युती भगव्या नाही तर फसव्या विचारांची असून ज्यांना अफजलखान म्हटलं त्यांनाच उद्धव ठाकरेंनी मिठी मारली अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसते नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. तसंच अधिवेशनात शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीची मागणी करणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
निवडणुकी आधीचे अधिवेशन म्हणजे युती सरकार आपल्या जाहीरनाम्यासाठी या अधिवेशनाचा वापर करणार, असा आरोपही यावेळी विरोधकांनी केला. शेतकरी कर्जमाफी, शासकीय नोकरभरती आदी मुद्द्यांवर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार असल्याचं विरोधकांनी स्पष्ट केलं. हे सरकार केवळ फसव्या घोषणा करतं, आतापर्यंत किती जागांवर भरती केली असा प्रश्न विचारत विखे-पाटील यांनी, गेल्या वर्षी २८ मार्च २०१८ मध्ये ७२ हजार नोकरभरतीबाबत मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला सांगितलं होतं. एक वर्ष झालं पण एकही जागा भरलेली नाही.. आचारसंहितेच्या तोंडावर पुन्हा नोकरभरतीचे गाजर सरकार दाखवेल असे सांगून ते म्हणाले कि , भाजपा सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढल्या, शेतकरी अनुदानाचं नवं गाजर सरकारने दाखवलं, सरकारच्या फसव्या घोषणांना जनता बळी पडणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!