Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Pulwama भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान स्थिती भयानक : ट्रम्प

Spread the love

भारत आणि पाकिस्तान यांच्यात देशांतर्गत परिस्थिती अत्यंत भयानक असल्याचे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या कार्यालयात पत्रकारांशी बोलताना केल्याचे वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेने दिले आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यात विविध विषयावर मतभेद असून दोन्हीही अंतर्गत निर्माण झालेली परिस्थिती भयानक झालेली आहे. 14 फेब्रुवारी रोजी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 41 जवान धारातीर्थी पडल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मदने स्वीकारल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर भारतीयांमध्ये तीव्र भावना आहेत.

या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी सर्वतोपरी उपाय योजना करण्याचे ठरविल्यानंतर पाकिस्तानची चिंता वाढली आहे. त्यामुळे तातडीने पाकिस्तानचे प्रमुख ईम्रान खान यांनी पत्रपरिषदेत सरकारचा पुलवामा हल्ल्याशी संबंध नसल्याचे घोषित करून जर भारताने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही प्रत्यूत्तर देऊ असे म्हटले आहे. आपल्या सैन्याला त्यांनी तसे आदेशही दिले आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राष्ट्राध्यकक्षांनी चिंता व्यक्त करुन दोन्ही देशांच्या दरम्यान परिस्थिती भयानक असल्याचे म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!