Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#गल्ली ते दिल्ली : दुपारपर्यंतच्या बातम्या : #News_Updates

Spread the love

१. वंचित बहुजन आघाडीची आज सायंकाळी शिवाजी पार्कवर सभा, भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी सभेला संबोधित करणार
२. प्रवासी भारतीय केंद्रात १९० देशांच्या प्रतिनिधींशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला संवाद
३. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी निश्चित; विश्वसनीय सूत्रांची माहिती
४. बेंगळुरूत एअरो शोवेळी लागलेल्या आगीत १०० हून अधिक कार जळून खाक
५. भाजपने नागपूर स्टेशन रोड परिसरात १०० फूट उंचीचा झेंडा फडकवला, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते झालं ध्वजारोहण
६. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना निवडणूक कामाला लागण्याचे आदेश, शिवसेनेची बैठक संपली
७. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपची क्लस्टर औरंगाबादेत बैठक सुरू, बैठकीला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, क्लस्टर प्रमुख ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विजया रहाटकर उपस्थित
८. सध्या विद्यापीठांचे कुलगुरु विद्यार्थ्यांचा विचार करण्याऐवजी ठराविक विचारधारेचा अधिक विचार करत आहेत. या विचारधारेसाठी भारतीय शिक्षा प्रणालीचा ते हत्यारा सारखा वापर करत आहेत. हा विद्यार्थ्यांचा अवमानच आहे- राहुल गांधी
९. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी साधला आयआयटीच्या विद्यार्थ्यांशी संवाद
टीम इंडियाही पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठी उभी आहे. पाकिस्तानसोबत खेळायचं की नाही याचा निर्णय सरकारच घेईल: विराट कोहली
१०. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत गाडगेबाबा प्रतिष्ठान तर्फे औरंगाबादेत मोटारसायकल रॅलीचं आयोजन
११. नवी दिल्ली: समाजवादी पार्टीचे नेते मुलायमसिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्या बेहिशोबी मालमत्तेच्या सीबीआय चौकशीचा अहवाल सादर करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका
१२. नगर-औरंगाबाद रोडवर दुधाचा टँकर आणि खासगी बसच्या अपघातात तीन ठार, १९ जखमी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!