Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

५५ महिन्यात ९३ परदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीं : २०२१ कोटी रुपये खर्च

Spread the love

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदेश दौऱ्यावरुन नेहमी मोठी चर्चा केली जाते. पंतप्रधान मोदी हे देशात कमी आणि विदेशात जास्त असतात अशी विरोधकांकडून टीका केली जाते. गेल्या सहा महिन्यात मोदींचे विदेश दौरे कमी झाले आहेत. निवडणुका होईपर्यंत ते विदेश दौऱ्यावर जाणार नसल्याचे सांगण्यात येत होते. परंतु, निवडणुकीच्या आधी ते दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी गुरुवारी दक्षिण कोरियात दाखल झाले. २०१९ च्या लोकसभेपूर्वी पंतप्रधानांचा हा शेवटचा अधिकृत परदेश दौरा आहे. पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारल्यापासून त्यांचा हा ५५ महिन्यांतील ९३ वा परदेश दौरा आहे. त्यावर २०२१ कोटी रुपये खर्च झाले असल्याचे वृत्त लोकसत्ता या दैनिकाने दिले आहे .

परदेश दौऱ्यात मोदींनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची बरोबरी केली आहे. त्यांनी १० वर्षांत ९३ विदेश दौरे केले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १५ वर्षांत ११३ विदेश दौरे केले होते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी ४८ दौरे केले होते. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ६८ वेळा विदेश दौरे केले होते. मोदी यांच्या प्रत्येक दौऱ्यावर २२ कोटी रुपये खर्च झाले तर मनमोहन सिंग यांच्यासाठी २७ कोटी खर्च झाले आहेत. दक्षिण कोरियापूर्वी मोदी यांनी ९२ विदेश दौरे केले आहेत. त्यावर एकूण २०२१ कोटी रुपये खर्च झाले. त्यांच्या एका दौऱ्यावर सरासरी २२ कोटी रुपये खर्च झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक दौरे २०१५ मध्ये केले. या वर्षी ते २४ देशांमध्ये गेले. २०१६ व २०१८ मध्ये १८-१८ देशांत गेले. २०१४ मध्ये ते १३ देशांमध्ये गेले होते. मोदी यांनी प्रत्येकी ५ वेळा अमेरिका तर प्रत्येकी ३ वेळा फ्रान्स-जपानचा दौरा केला. मोदींनी पाच वर्षांत एकूण ४९ विदेश दौरे केले. यादरम्यान ते ९३ देशांत गेले. त्यातील ४१ देश असे आहेत, जेथे ते पहिल्यांदा गेले. १० देशांमध्ये ते दोन वेळा गेला. फ्रान्स, जपानमध्ये ३-३ वेळा गेले. चीन-अमेरिकेत ५-५ वेळा गेले. रशिया, सिंगापूर, जर्मनी, नेपाळमध्ये ४-४ वेळा गेले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!