Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘विमान अपहरण’ करण्याची धमकी , सर्वत्र दक्षतेचा इशारा

Spread the love

‘विमान अपहरण’ करण्याची धमकी देणाऱ्या एका फोनमुळे देशातल्या सर्व विमानतळांना खबरदारीचा उपाय म्हणून अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईत एअर इंडियाच्या ऑपरेशन सेंटरमध्ये हा दूरध्वनी आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, ‘एक फ्लाइट हायजॅक करून पाकिस्तानात नेण्यात येईल. ही धमकी गांभीर्याने घेत देशातल्या सर्व विमानतळांना अति दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. विमानात बसणाऱ्या सर्व प्रवाशांची कसून तपासणी आणि कार पार्किगमध्ये जाणाऱ्या गाड्यांचीही कडेकोट तपासणी करण्यात येत आहे.
एअर इंडियाच्या ऑपरेशन नियंत्रण कक्षात हा धमकीचा फओन आला. ‘एका भारतीय एअरलाइन्सच्या विमानाचं अपहरण करून ते पाकिस्तानात नेण्यात येणार आहे,’ असं दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं.पुलवामा हल्ल्यानंतर विमानतळांची सुरक्षा व्यवस्था आधीच वाढवण्यात आली होती. पण शनिवारच्या या धमकीच्या फोनमुळे ब्युरो ऑफ सिविल एव्हिएशन सिक्युरिटी (BCAS)ने सर्व विमानतळांना खबरदारीचे निर्देश जारी केले आहेत. यात टर्मिनल आणि ऑपरेशन क्षेत्रात जाण्यापूर्वी कसून तपासणी आणि गाड्यांची तपासणी तसेच प्रवासी, कर्मचारी, सामान, कॅटरिंग आदींची कडेकोट तपासणीचे आदेश आहेत. विमानतळाच्या प्रवेशद्वारावर अचानक केली जाणारी तपासणी वाढवण्याचेदेखील आदेश आहेत. विमानतळावरील सुरक्षा वाढवणे, क्विक रिअॅक्शन पथके तैनात करणे आदींचा यात समावेश करण्यात आला आहे. हा फोन बनावट, खोडसाळही असू शकतो. पण पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा एजन्सीज अशा कोणत्याही धमकीकडे दुर्लक्ष न करण्याचा निर्धार सुरक्षा यंत्रणांनी केला आहे .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!