Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#गल्ली ते दिल्ली : आज दिवसभरात : महत्वाच्या बातम्या …

Spread the love

१. कट्टरवाद आणि दहशतवादाने जागतिक स्वरुप धारण केले आहे; जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी दहशतवाद धोकादायक
– पंतप्रधान, नरेंद्र मोदी
२. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सेऊल शांती पुरस्काराने सन्मान; पुरस्काराची १ कोटी ३० लाखांची रक्कम ‘नमामि गंगे योजने’ला
३. नाशिक, धुळे, जळगावमध्ये आयकर खात्याचे मागील ३ दिवसांपासून छापासत्र; कट प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांच्या ५५ ठिकाणांवर छापे
४. काश्मिरी विद्यार्थ्यांवर हल्ला: सुप्रीम कोर्टाकडून सर्व राज्यांना नोटीस
५. नागपूर येथे आजपासून मराठी नाट्यसंमेलनास सुरुवात
६. कोपर्डी प्रकरणात सुरुवातीच्या काळात आरोपींचे वकीलपत्र घेण्यासाठी आलेल्या मंगलेश बापट यांची पदवी बोगस असल्याचे सिद्ध; गुन्हा दाखल करण्याचा कोर्टाचा आदेश
७. भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळले पाहिजेः तेजस्वी यादव यांचं मत
८. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांची भेट
९. ७४ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह एका व्यक्तिला बीएसएफकडून अटक
१०. आयपीएलच्या उद्घाटन समारंभात मिळालेली रक्कम शहीद कुटुंबीयांना देण्याचा बीसीसीआयचा निर्णय
११. विश्वचषकात पाकिस्तानबरोबर खेळण्याचा निर्णय केंद्र सरकारवर सोडल्याची बीसीसीआयची माहिती
१२. कोरेगाव-भीमा प्रकरणः आनंद तेलतुंबडे यांच्या जामीन याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात २७ फेब्रुवारी रोजी सुनावणी
१३. भाजपशी युती केल्यामुळे सेनेचे अहमदागरचे जिल्हा समन्वयक पक्षाबाहेर
१४. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडून भविष्यात भारतामध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित न करण्याचा निर्णय , पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्याचे कारण
१५. मुंबईवर दहशतवादी हल्ल्याच्या सूचनेमुळे हाय अलर्ट जारी.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!