Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारतात आला जगातला पहिला 32MP पॉप-अप सेल्फी कॅमेरा, Vivo V15 Pro

Spread the love
  1. स्मार्टफोन बनवणाऱ्या विवो कंपनीने भारतात आपला नवा Vivo V15 Pro हा स्मार्टफोन लाँच केला आहे. 20 फेब्रुवारीपासून या स्मार्टफोनसाठी आगाऊ नोंदणी करता येणार आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारात हा स्मार्टफोन उपलब्ध असेन. 32MP पॉप-अप सेल्फी कॅमेरा असलेला हा जगातील पहिला फोन असल्याचा दावा विवो कंपनीने केला आहे. Vivo V15 Pro मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलं असून 0.37 सेकंदांमध्ये फोन अनलॉक होईल असा दावा कंपनीने केला आहे. या स्मार्टफोनचा फ्रंट कॅमेरा डिस्प्लेच्या मागे लपलेला आहे आणि सेल्फीसाठी क्लिक केल्यानंतर कॅमेरा आपोआप पॉप-अप होतो.
    या स्मार्टफोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा सेटअप म्हणजेच तीन कॅमेरे असतील. तीन कॅमेऱ्यांपैकी 48 मेगापिक्सलचा एक प्रायमरी कॅमेरा आणि याशिवाय 8 व 5 मेगापिक्सलचे दोन अन्य कॅमेरा असतील. या फोनमध्ये ६.३९ इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून फोनमध्ये क्वॅालकॅम स्नॅपड्रॅगन ६७५ प्रोसेसर असणार आहे. या व्यतिरीक्त हा फोन Android Pie ऑपरेटींग सिस्टमवर चालेल. यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असेल, मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येणं शक्य आहे. 28 हजार 990 रुपये इतकी या फोनची किंमत ठेवण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!