Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

युद्धाची शक्यता लक्षात घेऊन पाकिस्तानच्या हालचाली

Spread the love

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवरच्या कारवाईसाठी मोदींवर दबाव वाढत आहे. इस्रायल, अमेरिका, रशियासारख्या देशांनीही भारतावर झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला असून, भारतानं निर्णायक कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे पाकिस्ताननंही युद्धाची तयारी सुरू केली आहे. भारतानं जर युद्धाचा मार्ग पत्करलाच तर पाकिस्तानही भारताला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. तसेच जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना कोणत्याही परिस्थितीत भारताच्या दबावात येऊ नका, असं सांगितलं असून यानंतरच पाकिस्तानने युद्धाची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं सर्व लष्करी रुग्णालयांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तान सरकारकडूनही लष्कराला कारवाईचे सर्व अधिकार देण्यात आले असून पाकिस्तानी लष्कराने जिलानी रुग्णालयाला एक पत्र पाठवलं आहे. या पत्रात भारताशी युद्ध होण्याची शक्यता लक्षात घेता वैद्यकीय मदतीसाठी सर्व तयारी करण्यास सांगण्यात आलं आहे. राज्यातील सर्व लष्कर आणि सिव्हिल रुग्णायलांचा समावेश आहे.
लष्कर रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवण्यास सांगण्यात आले असून, सामान्य रुग्णालयांमध्ये जवानांसाठी २५ टक्के बेड आरक्षित ठेवण्यास सांगण्यात आलं आहे’. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर लॉन्चपॅडवरील सर्व दहशतवाद्यांना तिथून हटवलं आहे. पीओके सरकारने लोकांना सुरक्षित रस्त्याचा वापर करण्याचं आवाहन केलं आहे. कोणत्याही कारणाशिवाय नियंत्रण रेषेजवळ जाऊ नये, रात्रीच्या वेळी गरज नसल्यास विजेचे दिवे लावू नका, असे निर्देश पाकिस्तान सरकारनं पीओकेमधील लोकांना दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!