Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धनगर आरक्षण : उद्धव ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट : भाजपही आग्रही !!

Spread the love

धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्दयावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. वर्षा बंगल्यावर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा झाली. यावेळी बैठकीला सुभाष देसाई यांचीही उपस्थितीती होती. मराठा समाजाला शासकीय नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण मिळाले असतानाच आता राज्यात धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.
धनगर समाजास आरक्षण देण्याची घोषणा पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप धनगर आरक्षणाची मागणी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला असून गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यात अनेक भागात धनगर समाजाने आंदोलन देखील केले होते.धनगर आरक्षणासंदर्भात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा अहवाल प्राप्त होताच, केंद्राकडे तशी शिफारस केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबर महिन्यात दिले होते. दुसरीकडे शिवसेनाही धनगर समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी आग्रही आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!