Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#गल्ली ते दिल्ली # एक नजर : महत्वाच्या बातम्या …

Spread the love

१. तिहेरी तलाक अध्यादेशाला राष्ट्रपतींची मंजूरी
२. पुलवामा येथे हल्ल्यानंतर अवघा देश दुःखात बुडाला असताना पंतप्रधान मोदी शूटिंगमध्ये व्यग्र होते, दहशतवादी हल्ल्यानंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभा सुरू, काँग्रेसचा निशाणा
३. किसान सभेच्या मागण्या मान्य झाल्यामुळे लॉंग मार्च स्थगित : शेतकऱ्यांच्या मागण्यावर सरकारतर्फे लेखी आश्वासन
४. धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
५. धनगर मुलांच्या हातात अनुसूचित जमातीचे दाखले मिळाल्यावरच खरे म्हणायचे; शरद पवार यांचा फडणवीस सरकारला टोला
६. पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नाहीः इम्रान खानचा पुनरुच्चार
७. बाळासाहेब आंबेडकरांच्या विरोधात उमेदवार नाही , आम्ही कमळावर निवडणूक लढविणार नाही : केंद्रीयमंत्री रामदास आठवले
८. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती
९. यवतमाळमध्ये काश्मिरी तरुणाला केलेल्या मारहाणीबद्दल युवा सेनेचा माफीनामा
१०. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा २४ जानेवारी रोजी काश्मीर दौऱ्यावर; शहिदांना वाहणार श्रद्धांजली
११. काश्मीर समस्या ही जवाहरलाल नेहरुंनी दिलेली देणगी आहे. सरदार पटेल पंतप्रधान असते तर हा प्रश्न उद्भवू दिलाच नसता: अमित शहा, भाजप अध्यक्ष
१२. विश्वचषक २०१९: भारत-पाक सामन्याबाबत परराष्ट्र मंत्रालय, क्रीडा मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सल्ला घेतल्यानंतर निर्णय घेतला जाईल;
सीओए सदस्य डायना एडल्जी यांची माहिती
१३. कामगार भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात वाढ; आता मिळणार ८.६५ टक्के व्याज
१४. अनुसूचित जाती प्रवर्गात स्वतंत्र आरक्षण देण्याची लहु प्रहार संघटनेची मागणी; औरंगाबादेतील क्रांती चौकात केले नारळ फोडो आंदोलन
१५. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे ७ व्या अखिल भारतीय सम्यक साहित्य संमेलनाचे उद्घाटन
१६. औरंगाबादमध्ये पुलवामा हल्ल्याचा निषेध, पाकिस्तान, चीनविरोधात जोरदार घोषणाबाजी, पाकिस्तानचा झेंडा जाळला
१७. मुंबईतील अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं काम बंदच राहणार, तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
१८. ज्येष्ठ चित्रपट निर्माते आणि राजश्री फिल्मचे संस्थापक राज कुमार बडजात्या यांचे मुंबईत निधन
१९. अमेठी आणि रायबरेलीसह पाच जागा वगळता सपा -बसपाचे जागा वाटप जाहीर
२०. सेऊल पीस प्राईजने मोदींचा गौरव : वर्षभरात भारत टॉप ५० देशांमध्ये

#Top_News 21.02.2019

आपलं सरकार

Click to listen highlighted text!