Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एका क्लिकवर शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता देताहेत मोदी

Spread the love

रविवारी २००० रुपयांचा पहिला हप्ता ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजनेंतर्गत मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणार आहे. गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात मोदी एका क्लिकने देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार असल्याची माहिती भाजप खासदार आणि किसान मोर्चाचे नेते विरेंद्र सिंह आणि राजा वर्मा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला  दिली आहे . मोदी सरकारनं यावर्षीच्या अर्थसंकल्पात छोट्या शेतकऱ्यांसाठी ‘पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी’ योजना घोषित केली. शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देणारी ही योजना महत्वाची समजली जाते. या योजनेवर ७५ हजार कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्याला वर्षाला सहा हजार रुपये तीन हप्त्यांत दिले जातील. त्याचा पहिला हप्ता रविवारी देण्यात येईल. योजनेच्या अंमलबजावणीकरिता आवश्यक सर्व कामे झाली आहेत.

या योजनेंतर्गत दरवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये मिळणार असून पाच एकराच्या आत जमीन असलेल्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शेतकरी कुटुंबाला दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांत मिळतील. त्यासाठी तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी लागेल. पाच एकराच्या आत जमीन असलेल्या म्हणजेच तलाठ्याकडे असलेल्या यादीतील शेतकऱ्यांना नाव, गाव, वय, व्यवसाय, खाते क्रमांक, क्षेत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यांसह घोषणापत्र भरून तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे जमा करावे लागणार आहे .

केंद्रापाठोपाठ राज्य सरकारचीही ४,५०० कोटींची तरतूद

दरम्यान या निकषामुळे राज्यातील सुमारे ७ लाख शेतकरी केंद्र सरकारच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. लोकसभेनंतर राज्यात विधानसभा निवडणूक होणार असून या पार्श्वभूमीवर इतका मोठा शेतकरी वर्ग नाराज होणे हे सत्ताधाऱ्यांना महागात पडू शकते.
केंद्र सरकारच्या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या सात लाख शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार स्वतंत्र योजना सुरु करणार असल्याचे वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिले आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ४ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक अनुदानासह विविध सवलती देखील दिल्या जातील, असे वृत्तात म्हटले आहे. राज्यातील शेतकरी वर्ग अजूनही सरकारवर नाराज आहे. आश्वासन देऊनही वर्षभरापासून पूर्ण न झालेल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने पुन्हा एकदा मोर्चा काढण्यात आला होता. नाशिकवरुन हा मोर्चा मुंबईच्या दिशेने रवाना देखील झाला होता. शेतकरी वर्गातील नाराजी दूर करण्यासाठी गिरीश महाजन आणि किसान महासभेचे प्रतिनिधी यांच्यात गुरुवारी बैठक झाली. यात सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला होता.
लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. मोदी सरकार रविवारी या योजनेचा पहिला हफ्ता देणार आहे. गोरखपूर राष्ट्रीय किसान संमेलनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी एका क्लिकवर देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ हजार कोटी रुपये जमा करणार आहेत. यंदाच्या वर्षात घोषित करण्यात आलेल्या सर्वात मोठ्या योजनांपैकी ही एक आहे. या योजनेंवर ७५ हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!