Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सुप्रीम कोर्टाकडून महाराष्ट्रासह ११ राज्यांना नोटिसा : काश्मिरींवर हल्ले

Spread the love

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्यानंतर संतप्त संघटनांकडून देशभरातील काश्मिरी विद्यार्थ्यांना लक्ष्य केलं जात आहे. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सुप्रीम कोर्टानेही या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्रासह ११ राज्यांना कोर्टानं नोटिसा बजावल्या आहेत. काश्मिरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक पावलं उचलावीत, असे आदेश दिले आहेत.
केंद्र सरकारसह महाराष्ट्र, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू-काश्मीर, हरयाणा, मेघालय, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, उत्तराखंड आणि दिल्ली या राज्यांना सुप्रीम कोर्टानं नोटिसा पाठवल्या आहेत. हिंसाचाराच्या घटनांच्या तपासासाठी नियुक्त केलेले नोडल ऑफिसर यांनीही काश्मिरी विद्यार्थ्यांची सुरक्षा सुनिश्चित करावी. नोडल ऑफिसरकडे काश्मिरी विद्यार्थी तक्रार दाखल करू शकतात, असं कोर्टानं म्हटलं आहे.  पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली. तसंच विविध राज्यांमध्ये शिक्षण घेत असलेल्या काश्मिरी विद्यार्थ्यांनाही मारहाण झाली. भीतीपोटी काही विद्यार्थी हॉस्टेलमधून बाहेर पडत नाहीत. त्यामुळं त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काश्मिरी विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याच्या मागणीची याचिका कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीदरम्यान, कोर्टानं राज्यांना नोटिसा बजावून सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!