Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत-आणि सौदी अरेबियामध्ये पाच महत्त्वपूर्ण करार

Spread the love

नवी दिल्ली – भारतभेटीवर आलेले सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज भारत आणि सौदी अरेबियामध्ये पाच महत्त्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. त्यानंतर सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान आणि आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संयुक्तपणे प्रसारमाध्यमांना संबोधित केले. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याचा उल्लेख करत दहशतवादाविरोधात लढण्याची गरज व्यक्त केली. सौदीच्या राजपुत्रांनीही दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
पुलवामा येथील भ्याड हल्ल्यानंतर जगभरातून या हल्ल्याचा निषेध झाला होता. दरम्यान, या हल्ल्याचे पडसाद आज झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमा यांच्या भेटीवरही पडले. या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सौदीचे राजपुत्र म्हणाले की, दहशतवादाच्या मुद्द्यावर आणिही भारतासोबत सर्वप्रकारचे सहकार्य करण्यास तयार आहोत. गुप्तचर यंत्रणेापासून अन्य प्रकारचे सहकार्य करण्याचीही आमची तयारी आहे. तत्पूर्वी नरेंद्र मोदी यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना हा हल्ला म्हणजे संपूर्ण जगावर असलेल्या दहशतवादाच्या सावलीचे प्रतीक आहे, असे सांगितले. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांवर दबाव बनवण्याची आवश्यकता आहे, यावर आम्ही सहमत आहोत. अतिरेक्यांविरोधात भक्कम योजना आखण्याची गरज आहे, जेणेकरून दहशतवादी शक्ती तरुणांना भरकटवू शकणार नाहीत. सौदी अरेबिया आणि भारत यांच्यात याविषयी एकमत आहे, याचा मला आनंद आहे, असेही मोदींनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!