Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केरळ मधील पोलीस ठाण्यात रुजू झाला देशातील पहिला रोबो पोलीस

Spread the love

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात देशातील पहिला मानवी रोबो पोलिस ‘केपी-बॉट’चे उद्घाटन केले. केपी-बॉट पोलीस मुख्यालयाच्या मुख्य कार्यालयासमोर उभा राहून ड्युटी करणार आहे. केपी-बॉटला पोलीस उपनिरीक्षकाचा दर्जा देण्यात आला आहे. हा भारतातील पहिला ह्यूमनॉइड, तर जगातील चौथा रोबो आहे. डेटा गोळा करणे, तसेच पोलिसांच्या कामगिरीत सुधारणा घडवून आणणे ही कामे केपी-बॉट करणार आहे. पोलीस कर्मचाऱ्याचे मानवी रुप असलेला हा रोबो एका पोलीस कर्मचाऱ्याच्या जागी काम करणार आहे. तो मुख्यालयात आलेल्या लोकांचे स्वागतही करेल आणि त्यांच्या गरजेनुसार त्यांना निश्चित कार्यालयात जाण्याचे मार्गही सांगेल. या रोबोचा वापर फर्स्ट कॉन्टॅक्ट पॉइंटच्या धर्तीवर करण्यात येईल. पोलिसांच्या कामाचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने केपी-बॉटची मदत घेतली जाणार आहे. तसेच पोलिसांची कामगिरी उत्तम व्हावी यासाठीही त्याचा मोठा उपयोग होणार आहे. पोलिसांच्या कामकाजामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्यात भारतीय राज्यांचे नेतृत्त्व करणारे केरळ पोलीस मानवी रोबोच्या वापराने ऐतिहासिक कामगिरी करत आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री विजयन उद्घाटनानंतर म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!