Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काश्मीरमध्ये आता निमलष्करी दलाच्या जवानांनाही विमान प्रवासाची सुविधा

Spread the love

केंद्र सरकारनं पुलवामातील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आता जम्मू-काश्मीरमध्ये तैनात निमलष्करी दलाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार, निमलष्करी दलाच्या जवानांना यापुढं दिल्ली-श्रीनगर, श्रीनगर-दिल्ली, श्रीनगर-जम्मू व जम्मू-श्रीनगर दरम्यान विमानानं प्रवास करता येणार आहे. सुमारे ७ लाख ८० हजार जवानांना याचा लाभ होणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाचा हा निर्णय तात्काळ लागू होणार आहे. कर्तव्यावर असताना तसंच, सुट्टीवर जाताना वा पुन्हा रुजू होताना श्रीनगरहून येण्या-जाण्यासाठी ही सुविधा मिळेल. यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचाही समावेश असेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!