Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दहशतवाद्यांना मदत देणे बंद करा, डोनाल्ड ट्रम्प यांचा पाक, चीनला सल्ला

Spread the love

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पोसून त्यांना मदत देणे बंद करा, असा सल्ला अमेरिकेने पाकिस्तान आणि चीनला देत संयुक्त राष्ट्र संघातील आपापल्या जबाबदाऱ्या यथाशक्ती पार पाडा, असंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या दोन्ही देशांना सांगितलं आहे.
संयुक्त राष्ट्र संघाकडून घोषित करण्यात आलेले दहशतवादी पाकिस्तानमध्ये आश्रय घेत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. तर दुसरीकडे चीन वारंवार मित्रराष्ट्र असलेल्या पाकिस्तानला पाठीशी घालताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचा हा सल्ला महत्त्वाचा मानला जात आहे. दहशवाद्यांना आश्रय देऊ नका आणि मदत करू नका, असं अमेरिकेने आपल्या परराष्ट्र विभागामार्फत संयुक्त राष्ट्र संघातील सर्व देशांना सांगितलं आहे. पाकिस्तानच्या कुरापती आणि चीनचं आडमुठं धोरण या पार्श्वभूमीवरच अमेरिकेने हा संदेश दिल्याचं स्पष्ट आहे. दरम्यान, पुलवामा दहशतवादी हल्ला ही भयानक घटना असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
या घटनेबाबची माहिती मिळाली असून या प्रकरणी योग्य वेळी आमचे म्हणणे जाहीर करू अशी भूमिका डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतली आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेने भारताला पूर्ण पाठिंबा व्यक्त केल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केले आहे. दुसरीकडे, पुलवामा हल्ल्यानंतर भारताला स्वसंरक्षणाचा हक्क आहे, असे वक्तव्य डोनाल्ड ट्रम्प यांचे सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांनीही केले होते. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पियो, बोल्टन आणि व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव सारा साँडर्स यांनी देखील ‘जैश-ए-मोहम्मद’ आणि संघटनेच्या प्रमुखाविरोधात कारवाई करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!