Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोरियाच्या मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

Spread the love

कोरियन गणराज्याचे (दक्षिण कोरिया) मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत डाँगयंग किम यांनी आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.कोरियाच्या एलजी, सॅमसंग, ह्यूूंदाई, जीएस कॅल्टक्स कॉर्पोरेशन, बुसान बँक यांसह अनेक कंपन्या महाराष्ट्रात काम करीत असून त्यांना कुठल्याही प्रकारच्या अडचणी नसल्याचे डाँगयंग किम यांनी राज्यपालांना सांगितले.
कोरियाचे ९०० विद्यार्थी पुणे येथे शिकत असल्याचे डाँगयंग यांनी सांगून वाणिज्यदूत या नात्याने आपले कार्यक्षेत्र महाराष्ट्रासह, गुजरात, तेलंगण, गोवा व मध्य प्रदेश हे आहे. तेथील कोरियन नागरिकांचे हित जपताना महाराष्ट्र व कोरिया यामध्ये व्यापार, सांस्कृतिक संबंध व विद्यार्थी देवाण- घेवाण वाढविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे डाँगयंग यांनी सांगितले.
भारतातून अनेक पर्यटक जपान मध्ये येतात, परंतु कोरियाबद्दल त्यांना माहिती नसल्यामुळे पर्यटक कोरियाला येत नाही. त्यामुळे उभय देशांमध्ये पर्यटनाला चालना देण्याला आपण प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उभयपक्षी व्यापार आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवितानाच कोरियाने महाराष्ट्राकडून फळांची आयात करावी अशी सूचना राज्यपालांनी वाणिज्यदूतांना केली. महाराष्ट्र डाळिंब, केळी, द्राक्षे, संत्रे, आंबे तसेच स्ट्राॅबेरी उत्पादनात अग्रेसर असून फळनिर्यातीचा उभय देशांना लाभ होईल, असे राज्यपालांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!