Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोणत्याही चौकशीला आम्ही तयार पुरावे द्या , कारवाई करू : इम्रान खान

Spread the love

भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास  हल्ल्याला उत्तर देणार

कोणत्याही चौकशीला आम्ही तयार पुरावे द्या , कारवाई करू , दहशतवाद मिटवावा अशी आमचीही इच्छा आहे. ७० हजार पाकिस्तानी दहशतवादामुळे मारले गेले आहेत असं असे एका पत्रकार परिषदेत सांगत भारतात नवी विचारसणी येण्याची गरज असल्याचं त्यांना यावेळी सांगितलं. काश्मीरमध्ये अशी परिस्थिती का आहे याचा विचार भारताने करण्याची गरज आहे. काश्मीरचा मुद्दा चर्चेने सोडवला पाहिजे याकडे भारत लक्ष का देत नाही आहे असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारून पुलवामा दहशतवादी हल्ल्याप्रकरणी भारताने कोणतेही पुरावे नसताना पाकिस्तानवर आरोप केले आहेत, अशा शब्दात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे नकारात भारताचे आरोप फेटाळून लावले आहेत.
निवडणुकीचा काळ आहे त्यामुळे पाकिस्तानला धडा शिकवा चर्चा सुरु आहे हे मी समजू शकतो असं त्यांनी यावेळी म्हटलं. यावेळी त्यांनी भारताने युद्ध छेडलं तर पाकिस्तान उत्तर देण्याचा विचार करणार नाही तर देणार अशी धमकीही त्यांनी यावेळी दिली. दहशतवादाच्या मुद्द्यावर आमची चर्चेची तयारी असून या हल्ल्याबाबतचे पुरावे भारताने आम्हाला द्यावेत आम्ही नक्की कारवाई करू असे आवाहनही खान यांनी भारताला केले आहे. मात्र, भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यास पाकिस्तान त्याला उत्तर देणार नाही असे समजू नये, पाकिस्तान हल्ल्याला उत्तर देणार, असा स्पष्ट इशाराही इम्रान खान यांनी भारताला दिला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पाक पंतप्रधानांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला पाकिस्तानमधील कुणी जबाबदार आहे हे सिद्ध करणारे पुरावे भारताने दिल्यास पाकिस्तान सरकार त्या विरोधात कठोर कारवाई करेल हे आमचे भारत सरकारला सांगणे आहे, असेही खान म्हणाले. पाकिस्तान देश स्थिरतेकडे वाटचाल करत असताना अशा प्रकारचे कृत्य तो करू शकत नाही. अशा प्रकारचा हल्ला करून पाकिस्तानला काय मिळणार आहे, असेही इम्रान खान यांनी म्हटले आहे.
संवादाने प्रश्न सुटू शकतो
दहशतवाद या विषयावर भारताने संवाद साधला पाहिजे. आम्ही भारताशी या विषयावर संवाद साधायला तयार आहोत. हा प्रश्न संवादानेच सुटेल अशा शब्दात इम्रान खान यांनी भारताला चर्चेचे आवाहन केले आहे. पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच इम्रान खान यांनी मी भारतीय सरकारसाठी उत्तर देत आहे असं सांगितलं. हा नवा पाकिस्तान आहे. नवी विचारसरणी आहे असं यावेळी इम्रान खान यांनी सांगितलं. यासोबतच कोणत्याही प्रकारच्या चौकशीला आम्ही तयार असून जे पुरावे आहेत ते भारताने आम्हाला द्यावेत, आम्ही कारवाई करु अशी मागणी इम्रान खान यांनी केली. यावेळी त्यांनी भारताशी कधीही चर्चा करायचं म्हटलं की आधी दहशतवादावर चर्चा करण्याची मागणी केली जाते. आम्ही दहशतवादावर चर्चा करण्यास तयार आहोत असं इम्रान खान यांनी यावेळी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!