Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवाजी महाराज न्यायासाठी लढणारे आदर्श राजे : पंतप्रधान

Spread the love

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन केले आहे. मोदींनी एक व्हिडिओ पोस्ट करत महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केले आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो असं मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधानांनी केलेल्या ट्विटमध्ये शिवाजी महाराजांबद्दल बोलताना ते म्हणतात, ‘शिवाजी महाराज हे सत्य आणि न्यायासाठी लढणारे आदर्श राजे होते. ते खरे देशभक्त होते. समाजातील सर्वच स्तरातील लोकांना ते आपले राजे वाटत. जय शिवराय.’ या ट्विटमध्ये मोदींनी एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये मोदींनी वेळोवेळी आपल्या भाषणांदरम्यान शिवाजी माहाराजांच्या प्रेरणादायी कार्याचा उल्लेख आहे. या व्हिडीओमध्ये मोदी म्हणतात, ‘आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. त्यांनी अनेक संकटे असतानाही आपल्या योग्यता आणि क्षमतेच्या आधारे सुशासन आणि प्रशासनाचा भारतीय इतिहासात नवा अध्याय लिहीला. जगाच्या इतिहासात शिवाजी महाराजांसारखी महान व्यक्ती सापडणे मुश्कील आहे, ज्यांनी संघर्ष करत असतानाही सुशासनाची परंपरा मजबूत करण्यासाठी आपले आयुष्य खर्च केले.’ त्यापुढे मोदींनी प्रभू रामचंद्रांच्या दाखला देत शिवाजी महाराजांची स्तृती केली आहे. ‘प्रभू रामांनी लहान लहान लोकांना, वानरांना एकत्र करुन आपली सेना स्थापन केली आणि विजय मिळवला. तशाच पद्धतीने शिवाजी महाराजांची संघटन कौशल्य वापरून शिवाजी महाराजांनी शेतकरी आणि मावळ्यांना संघटित करुन युद्धासाठी तयार केले,’ असंही मोदी या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!