Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to
Spread the love

प्रगल्भ शिक्षण व्यवस्थेसाठी मूल्यमापन आणि विश्लेषण महत्त्वपूर्ण – शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे

शिक्षण व्यवस्थेत विद्यार्थ्यांच्या आवश्यकतेनुसार आणि काळानुरुप शिक्षणातील बदलानुसार परिपूर्ण संरचना असणे आवश्यक आहे. शिक्षण व्यवस्था प्रगल्भ करण्यासाठी नवकल्पनांचे मूल्यमापन करणे आणि त्या कल्पनांचे विश्लेषण करणे महत्त्वपूर्ण असल्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना तसेच कौशल्य प्रशिक्षण घेणाऱ्यांना व्यासपीठ मिळावे, येणाऱ्या काळात विद्यार्थी रोगमुक्त आणि सुरक्षित असावा यासाठी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे बारा स्वयंसेवी संस्थाबरोबर सामंजस्य करार केला. सलाम बॉम्बे, टाटा ट्रस्ट, मॅजिक बस, उबर, टॉय बँक यांसारख्या एकूण बारा विविध संबंधित संस्थांचे अधिकारी सामंजस्य कराराच्या वेळी उपस्थित होते.
श्री. तावडे म्हणाले, सर्वच सुधारित गोष्टी व्यवस्थेत नसतात. काही गोष्टी या आपल्याला जबाबदाऱ्या शिकवतात, त्यामुळे शिक्षण क्षेत्रातील महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी शिक्षण क्षेत्रात काळानुरुप बदल होणे आवश्यक आहे. विविध जिल्ह्यामध्ये नवप्रकल्पांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
यावेळी पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी शाळेच्या मुलांसाठी मौखिक आरोग्य कार्यक्रम, उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नाटक माध्यमातून जीवन कौशल्य शिक्षण प्रदान करणे, रायगडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी शाळेच्या मुलांसाठी मौखिक आरोग्य कार्यक्रम, कॉलेज ऑफ इंजिनियरिंग पुणेने इनक्युबेटरसाठी सामंजस्य करार, उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत पाच ग्रंथालयांचे सामाजिक केंद्र आणि डिजिटल ग्रंथालयांमध्ये रुपांतरीत करणे, मुंबईच्या इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या उप कुलपतींने सेल्युलर शेतीमध्ये उत्कृष्टता केंद्र उभारणे, मीरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त यांनी मीरा भाईंदर मधील महापालिका शाळांमध्ये वॉश सुविधा लागू करणे, प्रकल्पाच्या पुनरुत्थानासाठीचा उद्देश पत्र अंतर्गत ड्रॉपआउट दर कमी करण्यासाठी तसेच मुलांना शाळेत पुन्हा आणण्यासाठी प्रकल्प तसेच तंबाखू मुक्त शाळा कार्यक्रम, तंत्र शिक्षण महासंचालनालयाने गोंडवाना, अमरावती, नागपूर या विदर्भातील विद्यापीठांमध्ये रोजगार कौशल्य प्रशिक्षण देणे, ए.एम.सी (पूर्व उपनगर) एम.सी.जी.एम ने मिशन गरीमा.ए.एम.सी (पश्चिम उपनगर) एम.सी.जी.एम नेमोबाईल वैद्यकीय युनिट्ससाठी औपचारिक भागीदारी.अल्पसंख्यांकच्या प्रधान सचिव यांनी युवकांना कॅब ड्राईव्हर्स बनविण्यासाठी कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणे असे बारा विविध सामंजस्य करार करण्यात आले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!