Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

चमत्कारावर नाही कामावर विश्वास ठेवा : प्रियांका गांधी

Spread the love

चमत्कारावर नाही कामावर विश्वास ठेवा असे सांगत काँग्रेसच्या राष्ट्रीय महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील प्रभारी प्रियंका गांधी या निवडणुकीच्या रणांगणात पूर्ण ताकदीनिशी उतरल्या आहेत. उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड येथे प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. कार्यकर्त्यांना आपल्याकडून कोणत्याही चमत्काराची अपेक्षा न ठेवता पक्षाची कामगिरी सुधारण्यासाठी मतदारसंघात जाऊन काम करा असा सल्ला त्यांनी दिला आहे. तसेच यावर सर्व निकाल अवलंबून असेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
प्रियंका गांधी यांनी यावेळी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षातून बाहेर काढण्यात येईल असा इशाराही दिला आहे. मतदारसंघांमध्ये नेमकी काय परिस्थिती आहे याची बैठकीदरम्यान प्रियंका गांधी यांनी चाचपणी केली. तसेच कार्यकर्त्यांना स्थानिक पातळीवर पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यास सांगितले आहेत. ‘मी या पदावर बसून कोणताही चमत्कार करु शकत नाही. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनीच पक्षाला मजबूत करण्याची गरज आहे. राज्यात पक्षाला बळ मिळावे यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे’, असं यावेळी प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!