Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

शिवसेना-भाजपची युतीची फक्त घोषणा बाकी : संजय राऊत

Spread the love

गेल्या काही दिवसांपासून राज्यात आणि देशातही उत्सुकतेचा विषय ठरलेली शिवसेना-भाजपची युती अखेर होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा करण्याची शक्यता शिवसेना नेते खासदार संजय राऊत व्यक्त केली आहे.केंद्रात व राज्यात सत्ता आल्यापासूनच एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या शिवसेना-भाजपमध्ये युती होणार का, हा कळीचा प्रश्न झाला होता. त्यातच शिवसेनेनं स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानं व भाजपवर सातत्यानं टीका करण्याची भूमिका घेतल्यानं युती होणं अधिकच कठीण झालं होतं. त्यातही शिवसेनेनं युतीसाठी काही अटी घातल्याचं समोर आल्यानं संभ्रम वाढला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि चक्रे फिरली. तेव्हापासून युतीची शक्यता वर्तवली जात होती.शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज त्यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब केलं. अमित शहा हे आज ‘मातोश्री’ निवासस्थानी येणार असून उद्धव यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर युतीची घोषणा होऊ शकते, असं राऊत म्हणाले. युतीतील अटी-शर्तींबाबतची चर्चा पूर्ण झाली आहे,’ असंही त्यांनी सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!