Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केंद्र सरकार जनमत का घेत नाही ? कमल हसन यांचा सवाल

Spread the love

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात निषेधाचे सूर उमटत असताना अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे नेते कमल हासन यांनी काश्मीरमधील जनमत चाचणीचा मुद्दा उपस्थित केला आहे. भारत सरकार जम्मू आणि काश्मीरमध्ये जनमत चाचणी का घेत नाही, असा सवाल त्यांनी चेन्नईतील एका सभेला संबोधित करताना विचारला आहे. केंद्र सरकार जनमत घेण्याबाबत कुणाला घाबरत आहे, असे विचारत हासन यांनी काश्मीरमधील जनमत चाचणीवर जोर दिला.
पुलवामा दहशतवादी हल्ल्याशी संबंधित प्रश्न विचारल्यानंतर हासन म्हणाले, ‘लष्करी जवान काश्मीरमध्ये शहीद होण्यासाठीच जातात, असे जेव्हा लोक बोलतात तेव्हा मला खरेच दु:ख होते. आपल्या सैनिकांनी का बरे मरावे?. आमच्या घराच्या वॉचमननेही का बरे मेले पाहिजे?, दोन्ही देशांचे राजकीय नेते जबाबदारीने वागले तर कोणत्याही सैनिकाला शहीद होण्याची आवश्यकताच लागणार नाही. नियंत्रण रेषाही नियंत्रणात राहील’
पाकव्याप्त काश्मीर ‘स्वतंत्र काश्मीर’ आहे. चेन्नईमधील सभेसाठी उपस्थित समुदायाला संबोधित करताना हासन यांनी पाकव्याप्त काश्मीरचा ‘स्वतंत्र काश्मीर’ असा उल्लेख केला. ते पुढे म्हणाले, की स्वतंत्र काश्मीरमधील लोक जिहादींचे फोटो ट्रेनमध्ये लावत आहेत. ते त्यांच्यासाठी हिरो आहेत. हे देखील एक मूर्खपणाचे काम आहे. भारतात देखील अशा मूर्खपणाच्या गोष्टी होत आहेत. भारत हा जगात एक उत्कृष्ट देश बनवायचा असेल, तर असे वागून चालणार नाही. यावेळी बोलताना त्यांनी काश्मीरमधील जनमत चाचणी घेण्याचा मुद्दा उपस्थित केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!