Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कुलभूषण जाधव निर्दोष आहेत : आंतरराष्ट्रीय न्यायालयात हरिश साळवे

Spread the love

पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावर आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) सुनावणी सुरू आहे. भारताच्या वतीने ज्येष्ठ वकिल हरिश साळवे बाजू मांडत आहेत. जाधव निर्दोष आहेत आणि पाकिस्तान त्यांना चुकीच्या पद्धतीने अडकवत आहे, असा युक्तीवाद साळवे यांनी केला आहे.
भारताकडे जाधव यांच्या अपहरणाचे पुरावे आहेत. पाकिस्तानने जाधव यांच्या अधिकारांचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तानने जाधव यांना कॉन्स्युलर अॅक्सेस दिलेला नाही हा मुद्दा साळवे यांनी आपल्या युक्तीवादात लावून धरला आहे. ते म्हणाले, ‘भारत आणि पाकिस्तानने व्हिएन्ना परिषदेत सहमती करार केला होता. पाकिस्तान जाधव यांना कॉन्स्युलर अॅक्सेस (दूतावासाशी संपर्क) देण्यासाठी सामंजस्य करारानुसार बांधील आहे. पण यासंदर्भात भारताने पाठवलेल्या १३ रिमाइंडर्स (स्मरणपत्रे)चे उत्तर दिले नाही.’
व्हिएन्ना करारातील अटींची व्याख्या करत साळवे आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. या कराराच्या विविध कलमांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की पाकिस्तान कसा भारताच्या एका निर्दोष नागरिकाचा जीव घ्यायचा प्रयत्न करत आहे.
कुलभूषण जाधव यांच्यावर लावलेल्या आरोपांची सविस्तर माहिती देण्याबाबत पाकिस्तान टाळाटाळ करत आहे. जाधव प्रकरणी पाकिस्ताननं नियमांचं उल्लंघन केलं आहे, असा आरोप साळवे यांनी कोर्टात केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!