Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

काँग्रेस-राष्ट्रवादीचं ठरलं : नांदेडमध्ये नारळ फुटणार !!

Spread the love

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनेही महाराष्ट्रात जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून २० फेब्रुवारी रोजी (बुधवारी) नांदेड येथे संयुक्त जाहीर सभेतून प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
लोकसभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी व मित्रपक्षांची महाआघाडी झाली असून नांदेड येथील इंदिरा गांधी मैदानावर बुधवारी सायंकाळी ५ वाजता महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा होईल, असे चव्हाण यांनी नमूद केले.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे, माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर, माजी उप मुख्यमंत्री छगन भुजबळ, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, गुजरात काँग्रेसचे प्रभारी राजीव सातव आदी नेते सभेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, नांदेडमधील सभेनंतर २३ फेब्रुवारी रोजी परळी येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने अशाच पद्धतीने महाआघाडीची संयुक्त प्रचार सभा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात येणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!