Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाकिस्तानात ‘टोटल धमाल’ प्रदर्शित करणार नाही : अजय देवगन

Advertisements
Advertisements
Spread the love

पुलवामामध्ये CRPF जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. बॅालिवूड अभिनेता अजय देवगन व त्याच्या टीमने देखील ‘टोटल धमाल’ चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती अजय देवगनने त्याच्या ट्विटर अकाउंटद्वारे सोमवारी दिली आहे. त्याने सांगितले,’सध्याची परिस्थिती पाहता ‘टोटल धमाल’च्या टीमने हा चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’ या निर्णयानंतर अजय देवगन व त्याच्या टीमचे चाहत्यांकडून सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. ‘टोटल धमाल’ हा बहुप्रतिक्षित विनोदी चित्रपट येत्या २२ फेब्रवारीला प्रर्दशित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगन सोबत माधुरी दिक्षित, अनिल कपूर, रितेश देशमुख, अर्शद वारसी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!