जनभावना म्हणून आम्ही एकत्र : उद्धव ठाकरे

Advertisements
Advertisements
Spread the love

आम्ही दोन्ही पक्ष हे समविचारी पक्ष आहोत तसेच शिवसेनेने जे प्रश्न उचलून धरले त्याबद्दल भाजपाने मान्यता दर्शवली. त्यामुळे आम्ही युतीला होकार दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. राम मंदिर झाले पाहिजे ही दोन्ही पक्षांची भूमिका आहे आणि हाच युतीसाठीचा मुख्य मुद्दा होता. रामराज्य चालवायचं असेल तर राम मंदिर झालंच पाहिजे ही शिवसेनेची भूमिका आहे. नाणारबद्दल आमचं म्हणणं भाजपानं ऐकून घेतलं. लोकांना नको असेल तर तो प्रकल्प तिथे प्रकल्प होणार नाही अशी भूमिका भाजपाने घेतली ही गोष्ट मनाला भावली. लोकांचं हित पाहूनच प्रकल्प साकारला गेला पाहिजे ही शिवसेनेची भूमिका घेतली. लोकहित जपण्याबाबत शिवसेनेने ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या भाजपालाही मान्य आहेत त्यामुळेच आम्ही एकत्र आलो. २५ वर्षे आमची युती होती. मध्यंतरी मतभेद झाले ते आम्ही लक्षात ठेवतो आहोत कारण असे कटू अनुभव येऊ नयेत अशी अपेक्षा आहे. आम्ही नवी सुरूवात करतो आहोत. आम्ही दोन्ही पक्षांनी एकत्र यावं ही जनभावना होती त्यामुळे जनभावना लक्षात घेऊन आम्ही एकत्र आलो आहोत असे उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Advertisements

आपलं सरकार