Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

सोशल मीडियातून हल्ल्याचे चुकीचे फोटो व्हायरल : सीआरपीएफ

Spread the love

शहिदांचे खोटे व्हायरल फोटो शेअर करु नका; सीआरपीएफचे नागरिकांना आवाहन

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सोशल मीडियातून या हल्ल्याचे चुकीचे फोटो व्हायरल होत आहेत. याद्वारे या शहीदांचा अपमान होत असल्याने असे फोटो आणि पोस्ट शेअर करु नका असे, आवाहन सीआरपीएफकडून जनतेला करण्यात आले आहे.
सीआरपीएफने म्हटले की, पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर शहिदांचे छिन्नविछिन्न अवस्थेतील फोटो व्हायरल होत आहेत. यातील बरेच फोटो हे बनावट असल्याचे आम्हाला आढळून आले आहे. काही समाजकंटक अशा स्वरुपाचे फोटो व्हायरल करीत आहेत, हे आपण रोखलं पाहिजे त्यासाठी सर्वांनी एकत्र व्हायला हवं. अशा स्वरुपाचे फोटो किंवा पोस्ट पुढे पाठवू नका, शेअर करु नका किंवा त्यांना लाईकही करु नका.
अशा प्रकारचे फेक फोटो किंवा पोस्ट जर तुमच्यापर्यंत आले तर कृपया ते पुढे न पाठवता webpro@crpf.gov.in या वेबसाईटवर याची माहिती द्या, असे आवाहनही सीआरपीएफकडून करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!