अमिताभकडून शहिदांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

Advertisements
Spread the love

दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चन यांनी मदतीचा हात दिला आहे. अमिताभ बच्चन यांनी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची आर्थिक मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे. हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून अनेकांनी पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून मदतीसाठी हात पुढे केला आहे. मदत करणाऱ्यांमध्ये अमिताभ बच्चन यांचाही समावेश असून सध्या ही मदत कशाप्रकारे शहीद जवानांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत.