Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दहशतवाद्यांच्या बाजूने फेसबुकवर पोस्ट टाकणाऱ्यांविरुद्ध कारवाई

Spread the love

काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला केल्यानंतर ट्विटरवर ‘हाउज द जैश’, ग्रेट सर अशी पोस्ट लिहिणाऱ्या बसीम हिलालविरुद्ध गोविंद वल्लभ पंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच विद्यापीठानेही या विद्यार्थ्याला निलंबित केले आहे.तर काश्मीरात ” याला म्हणतात सर्जिकल स्ट्राईक अशी पोस्ट करणारांवरही कारवाई करण्यात आली आहे.
रियाझ अहमद वाणी आणि इक्बाल हुसेन अशी या दोन तरुणांची नावे आहेत. रियाझ हा श्रीनगरमध्ये मेकलॉड्स फार्मासुटिकल्स कंपनीत प्रोफेशनल विक्री अधिकारी या पदावर कार्यरत आहे. तर, इक्बाल हुसेन हा झायडस हेल्थकेअर या कंपनीत मार्केटिंग एक्झिक्युटीव्ह पदावर कार्यरत आहे.

पाकचा जयघोष करणारा तो टि. सी. निलंबित

या ठिकाणी जमलेले सर्व लोक ‘भारत माता की जय’, ‘पाकिस्तान मुर्दाबाद’, अशा घोषणा देत होते. परंतु, कुमार उपेंद्र सिंहने ‘पाकिस्तान जिंदाबाद’ अशी घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीमुळे उपस्थित लोक चांगलेच संतापले. पोलिसांना यासंबंधी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी कुमार उपेंद्र सिंहविरुद्ध कलम १५३ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला व त्याला अटक केली आहे. रेल्वे प्रशासनाला याची माहिती होताच रेल्वेने गंभीर दखल घेत उपेंद्र बहादूर सिंहला तडकाफडकी निलंबित केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!