Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Mahanayak_Live सपोनि अनिल परजने यांनी स्वत:च्या डोक्यात बंदुकीने गोळी झाडून घेतली

Spread the love

गोंदी ता. अंबड पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले सपोनि अनिल परजने यांनी स्वत:च्या डोक्यात बंदुकीने गोळी झाडून घेतली

अंबड तालुक्यातील गोंदी येथील सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे यांनी शुक्रवारी सकाळी१० वाजेच्या दरम्यान स्वत:कडे असलेल्या रिव्हॉल्व्हर गोळी झाडून घेवून आत्महत्या केली आहे.

ही आत्महत्या त्यांनी कोणत्या कारणामुळे केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. गेल्या दोन वर्षांपासून गोंदी येथील पोलीस ठाण्यात ते कार्यरत होते. मध्यंतरी वाळू माफीयांच्या मुद्यावरून त्यांचे आणि वाळू माफीयांचे तसेच पोलीस दलातील वरिष्ठांसोबत किरकोळ वाद झाले होते. ते मुळचे अंमलनेर तालुक्यातील रहिवाशी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. या घटनेची माहिती मिळाल्यावर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस उप. निरीक्षक सी. डी. सेवगन तसेच पो. उप. नि. हनुमंत वारे यांनी गोंदी येथे भेट दिली. २००६ साली अनिल परजणे हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून भरती झाले होते. नागपूरात त्यांना पहिली पोस्टींग मिळाली. सध्या ते जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्य बजावत होते. त्यांच्या आत्महत्येची वार्ता समजताच खालापुरी गावात दुखवटा पाळण्यात आला. सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

इतर बातम्या….

✓पुलवामा हल्ल्याची मोठी किंमत चुकवावी लागेल; मोदींचा इशारा
✓सैनिकांच्या बलिदान आणि शौर्याचा आम्हाला गर्व आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी
✓बदला घेणार, हा हल्ला कधीच विसरणार नाही, : सीआरपीएफचं ट्विट
✓वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांना २५-२५ लाख रुपयांची मिळणार नुकसान भरपाई
✓पुलवामातील हल्ल्यामुळे देशाच्या एकतेला कधीही तडा जाणार नाही – राहुल गांधी
✓माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध
✓बुलढाण्यातील दोन जवान शहीद
✓राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबादेत भ्याड हल्ल्याचा पोस्टर्स जाळून निषेध
✓पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे वाठोडा भागात दहशतवाद्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

✓नाशिक : शिवसेनेने जाळला पाकिस्तानचा पुतळा, शिव कार्यालयाबाहेर शिवसेना रस्त्यावर; पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

आपलं सरकार

Click to listen highlighted text!