Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुलवामा हल्ला: भारताने पाकिस्तानला ठणकावले

Spread the love

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत भारत सरकारने दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला चांगलेच खडसावले आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठीशी घालणे थांबवावे असे आवाहन भारताने केले आहे. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दहशतवाद्यांच्या यादीला मंजुरी द्यावी, असेही आवाहन केले आहे. पाकिस्तानसोबतच्या संबंधांमुळे चीनने कायम जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरवर बंदी आणण्यास विरोध केला आहे.

पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, ‘आपल्या शूर जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सरकार तीव्र शब्दांत निषेध करते. हा हल्ला पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने केला आहे. आंतरराष्ट्रीय हदशतवादी मसूद अझरच्या नेतृत्वाखालील दहशतवादी गटाने हा हल्ला केला. अझरला त्याचं अतिरेकी कारवायांचं जाळं मजबूत करण्यासाठी आणि भारतावर हल्ले करण्यासाठी पाकिस्तान सरकारने पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी सर्वतोपरी उपाय करण्यास भारत सरकार कटिबद्ध आहे. याचसोबत आम्ही दहशतवादाविरोधातला लढाही सुरू ठेवणार आहेत. आम्ही पाकिस्तानकडे मागणी करतो की त्यांनी दहशतवादी आणि अतिरेकी गटांना मदत करणं थांबवावं आणि त्यांच्या प्रदेशातून दहशतवाद्यांना मिळणारी रसद थांबवावी, इतर देशांमध्ये हल्ले करण्यासाठी त्यांना मिळणारी शस्त्रास्त्रे, दारुगोळा नष्ट करावा.’ आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाच्या सर्व सदस्यांना असे आवाहन करतो की जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करावं, असंही सरकारने निवेदनात म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!