Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुणे जिल्ह्याच्या विकासासाठी ३० कोटींचे करार – गिरीश बापट

Spread the love

पुणे जिल्ह्यातील आरोग्य, वाहतूक, शिक्षण, यांचा दर्जा अधिक सुधारण्यासाठी देशातील नामवंत प्रसिध्द कंपन्या व सेवाभावी संस्था यांचे सहकार्य घेण्यात येणार आहे या संदर्भातील सामंजस्य करार मुंबई येथे नुकतेच करण्यात आले आहेत, अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी दिली.
पुणे जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येनुसार आवश्यक असणाऱ्या सर्व आरोग्य सेवा, शिक्षण, वाहतूक, पर्यावरण याबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी शासकीय यंत्रणेला सहयोग व्हावा यासाठी डॉ. आनंद बंग यांच्या पुढाकाराने या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था व कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. यामध्ये लिपिन फाऊंडेशनच्या मदतीने ग्रामीण भागाच्या विकास करण्यात येईल. बॉश कंपनी वाहतूक शैक्षणिक पार्कची निर्मिती करण्यासाठी सहकार्य करणार आहे. पोषण आहारासाठी टाटा ट्रस्ट सोबत करार करण्यात आला आहे. मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी रूबल नागी फाऊंडेशन मदत करणार आहे. आरोग्यसेवा पुरविण्यासाठी पिरामल ही कंपनी, जिल्हा परिषदेतील मुलांना शौचालय उभारण्यासाठी मर्सडीज बेंझ या कंपनी सोबत करार करण्यात आला आहे. नॅचरल कॉन्झरवेशन ही जल प्रकल्पात काम करणार आहे. डॉ. सुयोग सोमकुवार हे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी मोफत सोनोग्राफी सेंटर सुरू करणार आहेत. तर सलाम बॉम्बे या संस्थेमार्फत 10 हजार मुलांना कला कौशल्ये शिकविण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आले आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!